आमचा मंत्री शेतकऱ्याच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधान सभेत पत्ते खेळतो किती दुर्दैव; कार्तिक वजीरचे स्वातंत्र्यदिनी भन्नाट भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 21:15 IST2025-08-15T21:14:42+5:302025-08-15T21:15:28+5:30

सुई ला छिद्र पाडता येत नव्हतं आता चंद्रावर पाऊल ठेवलाय. विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग धंदे यांची भरभराट चालली आहे. पण गरिबी श्रीमंतीची दरी वाढत चालली आहे. धन दांडगे लोक गरिबांना  लुटत आहेत राजकारणी लोक शेतकऱ्यांना  छळत आहे.

How unfortunate that our minister, instead of solving the problems of farmers, plays cards in the Legislative Assembly; | आमचा मंत्री शेतकऱ्याच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधान सभेत पत्ते खेळतो किती दुर्दैव; कार्तिक वजीरचे स्वातंत्र्यदिनी भन्नाट भाषण

आमचा मंत्री शेतकऱ्याच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधान सभेत पत्ते खेळतो किती दुर्दैव; कार्तिक वजीरचे स्वातंत्र्यदिनी भन्नाट भाषण

पवन पवार 

वडीगोद्री- आपण निवडलेला प्रतिनिधी विधानसभेत रम्मी खेळतो तरी त्याला याचे काही वाटत नाही शेतकरी येथे शेतीत लाखो रुपये टाकतात पीक येईन का नाही  हे त्यांना माहीत नसतं तरी  पण शेतकरी  प्रामाणिकपणे शेतीत राब राबतात आणि आमचा मंत्री शेतकऱ्याच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधान सभेत पत्ते खेळतो किती दुर्दैव आहे आमचे महाराष्ट्रातील चालू घडामोडी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय राजकारणी लोक धन दांडगे लोक कसे वागतात यावर कडक भाषण अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता  चौथी मध्ये शिकणारा कार्तिक वजीर उर्फ भोऱ्याने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केले आहे. 

जिल्हा परिषद शाळेत चौथी मध्ये शिकणाऱ्या कार्तिकचे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आज आपला 79 वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य म्हणाल की याला उकळ्या फुटतात त्याला उकळ्या फुटतात हे करू शकतो ते करू शकतो पण तुम्ही जबाबदार व कर्तव्य विसरता स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे.

सुई ला छिद्र पाडता येत नव्हतं आता चंद्रावर पाऊल ठेवलाय. विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग धंदे यांची भरभराट चालली आहे. पण गरिबी श्रीमंतीची दरी वाढत चालली आहे. धन दांडगे लोक गरिबांना  लुटत आहेत राजकारणी लोक शेतकऱ्यांना  छळत आहे.

आमचा स्वाभिमान कधीच विकत घेऊ शकणार नाहीत म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वाभिमानाने जगण्यासाठी पैशापुढे सत्तेपुढे लाचारी करू नका खोट्याला खोटं म्हणा अन् स्वाभिमान जपा एवढ बोलून थांबतो. असे भन्नाट भाषण कार्तिक उर्फ भोऱ्या वजीर ने केले आहे.


 

Web Title: How unfortunate that our minister, instead of solving the problems of farmers, plays cards in the Legislative Assembly;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.