जालना जिल्ह्यातील घनसावंगी, भोकरदन तालुक्यात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:45 IST2019-02-21T12:45:03+5:302019-02-21T12:45:59+5:30
काही ठिकाणी बुधवारी दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी, भोकरदन तालुक्यात गारपीट
जालना : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी, मोहपुरी, खालापुरीसह अन्य गावांमध्ये बुधवारी दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या.
भोकरदन तालुक्यातील लेहा व परिसरातही बुधवारी रात्री आठच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येथेही काही मिनिटे गारपीट झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी देखील जालन्यात याच महिन्यात मोठी गारपीट झाली होती. या गारपीटीचा मोठा फटका आंब्याच्या मोहराला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बुधवारी दुपारनंतर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जालना शहरातही ढगाळ वातावरण होते. भोकरदन, अंबड तसेच जालना शहरात पावसाचा शिडकावा झाला.