नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:52 AM2019-12-14T00:52:37+5:302019-12-14T00:52:45+5:30

शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.

Holding firmly against the Citizenship Amendment Bill, march | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/ भोकरदन : नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात जमियत ए उलमाच्या वतीने शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक - २०१९ हे धर्माच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणारे असून, या विधेयकामधून नागरिकांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप जमियत उलमा ए हिंद या संघटनेने केला आहे. या विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी दुपारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ए बील क्या कर पाये गा, आया है तो जाएगा’, ‘सीएबी जो आया है, नफरत साथ में लाया है’ यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन करीत केंद्र शासनाच्या या विधेयकाला विरोध दर्शविला. तसेच केंद्र शासनाने हे विधेयक रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अहेमद खान मोफ्ताई, इक्बाल पाशा, अब्दुल हाफिज, पाशा, मुफ्ती अब्दु र्रहमान, मुफ्ती सोहेल, हाफीज जुबेर, रईस अहमद मिल्ली, मुफ्ती फारूख, अ‍ॅड. अशपाक पठाण, मुफ्ती रमजान नदवी, मुफ्ती फहीम, मोहंमद हसन मोहल्ली, अहेमद बिन सईद आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भोकरदन, मंठा येथेही मागण्यांचे निवेदन सादर
भोकरदन येथेही उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या विधेयकाच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असून, विधेयक रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष हाफीज शेख शफीक, मौलाना हरून, उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, नसीम पठाण, कदिर बापू, शफीकखा पठाण, शब्बीर कुरेशी, शेख नजीर, त्र्यंबक पाबळे, प्रा. अब्दुल कुद्दुस, श्रावणकुमार आक्से, गज्जू कुरेशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
निवेदनावर तालुकाध्यक्ष मौलाना हाफिज शेख शफीक, मौलाना हारून देशमुख, मौलाना इम्रान नदवी, मौलाना शेख फेरोज, हाफिज जावेद, मुफ्ती खालिद, हाफिज अन्सार, मौलाना जमील, हाफिज अब्दुल माजिद, मौलाना इम्रान, मौलाना मुजीब, मौलाना अब्दुल रहेमान आदींची उपस्थिती होती.

Web Title: Holding firmly against the Citizenship Amendment Bill, march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.