पालिकेच्या भांग्याला सव्वाशे वर्षांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:11+5:302021-05-20T04:32:11+5:30
सकाळी चार वाजता भोंगा वाजवण्यामागे शहरातील स्चच्छता कर्मचाऱ्यांना जागे करण्यासह पहाटेची चाहूल झाली याची सूचना यातून दिली जात होती. ...

पालिकेच्या भांग्याला सव्वाशे वर्षांचा इतिहास
सकाळी चार वाजता भोंगा वाजवण्यामागे शहरातील स्चच्छता कर्मचाऱ्यांना जागे करण्यासह पहाटेची चाहूल झाली याची सूचना यातून दिली जात होती. यासाठी येथे स्वतंत्र भोंगाघर आहे. परंतु आता काळाच्या ओघात हे भोंगाघर आणि भोंग्याची फारशी गरज राहिली नाही. वाढलेले शहर व वाहने यामुळे आता भोंगा वाजविण्याची पध्दतही इतिहासजमा झाली आहे. या भोंग्याची देखभाल-दुरुस्ती जालना पालिकेकडे होती. ती आजही आहे; परंतु आता हा भाेंगा वाजविला जात नाही. आता माझे कार्यालय स्चच्छ कार्यालय या नवीन धोरणातून पालिकेला हे भोंगाघर सुधारण्याची संधी उपलब्ध झाली असून, जास्तीचा आवाज देणारा भोंगा आता बसविल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. पूर्वी हा भोंगा विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर बॅटरीवर चालत असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील घड्याळ ऐतिहासिक
पूर्वी सर्वांकडे घड्याळ नव्हते. त्यामुळे बाजारपेठेत आल्यावर वेळेची माहिती मिळावी म्हणून शहरातील मुख्य बाजारपेठेत कापड बाजाराजवळ तत्कालीन प्रशासनाने त्या काळात घड्याळाचे महत्त्व ओळखून एक उंच मनोरा उभा करून त्यावर मोठे घड्याळ बसविले होते. ते आजही कायम आहे.