शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:54 IST

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट

- अझर शेखवाटूर ( जालना) : परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत  फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध  केले आहे.   मराठवाडा आणि विदर्भातील  दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत आहेत. 

वाटूर येथील गजानन नरहरी माने या युवकाने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातून बीएसस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर राजेश नरहरी माने यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले आहे.  शेतीमधून उद्योग व रोजगार उभा करण्याच्या दृष्टीने दोघांनी आठ वर्षांपूर्वी वीस गुंठ्यांत रोपनिर्मिती सुरू केली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कोरवाडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकवता आला पाहिजे, हा त्यांच्या या रोपवाटिकेचा उद्देश होता. जिद्द, मेहनत आणि घेतलेल्या शिक्षणाचा दोघांना फायदा झाला. त्यांनी निर्माण केलेली विविध रोपे शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आणि येथूनच त्यांच्या रोपनिर्मिती उद्योगाला चालना मिळाली. रोपवाटिकामधून शेतकऱ्यांचा भरोसा माने बंधूंनी संपादन केला आहे. चांगल्या पद्धतीची रोपे चाळीस दिवसांत तयार करण्याचे तंत्र त्यांना अवगत झाले आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला निर्मितीतून उत्पन्नाचा स्त्रोत मिळावा, यासाठी माने बंधू विशेष करून भाजीपाल्यांच्या रोपांवर भर देत आहेत. सध्या दिवसाकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची रोपे तयार करून त्याची विक्री दोन्ही भावंडे करत आहेत. वर्षाकाठी  लाखो रूपयांची उलाढाल रोपवाटिकेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा जिल्ह्यात पोहचली वाटूरची ही रोपे माने बंधू बदलत्या काळानुरूप भाजीपाला आणि फळबागांच्या रोप निर्मितीवर भर देत आहे. त्यांच्या रोपवाटिकेत टोमॅटो, मिरची, कोबी, वांगे, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सीताफळ, जांभळ, शेवगा आदी भाजीपाला पिकांचे रोपे तयार होतात. सुरूवातीस अर्धा एकरात असलेली रोपवाटिका आता दोन एकरांत विस्तारली आहे. तसेच तयार केलेले रोपे आता घरपोच देण्याची सुविधा शेतकऱ्यांना माने बंधू देत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये त्यांची रोपे पोहचली आहेत.

विश्वास हीच आमची ओळखकष्टाला जेव्हा विश्वासाची साथ मिळते तेव्हा उत्साह वाढतो. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण करता आली याचे समाधान आहे. आम्हाला या रोपांमुळे ओळख मिळाल्याचे माने बंधुनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती