‘होय मी स्वार्थी’च्या माध्यमातून रुग्णांना होतेय मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:13+5:302021-05-23T04:29:13+5:30
‘होय मी स्वार्थी’ ही टॅगलाईन कशी सुचली, याबद्दल डॉ. सचदेव म्हणाले की, स्वार्थी म्हणजे केवळ लाभ होणे हेच नाही. ...

‘होय मी स्वार्थी’च्या माध्यमातून रुग्णांना होतेय मदत
‘होय मी स्वार्थी’ ही टॅगलाईन कशी सुचली, याबद्दल डॉ. सचदेव म्हणाले की, स्वार्थी म्हणजे केवळ लाभ होणे हेच नाही. येथे आम्ही स्वार्थीचा अर्थ स्वत:सह समाजासाठी जागृत राहण्यासाठी केला आहे. मी स्वार्थी म्हणजेच प्रत्येकाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन म्हणजेच मास्क लावणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर ठेवून संपर्क करणे, गर्दी टाळणे, दुखणे अंगावर न काढणे या बाबी ‘मी स्वार्थी’मध्ये मोडतात. जर प्रत्येकाने काळजी घेतली तर कोरोनाची दुसरी काय, पण तिसरी आणि कितीही भीषण लाट आली तरी हे नियम पाळल्यास तिचा शिरकाव मानवी शरीरात होणार नाही. एवढे मात्र खरे असल्याचे डॉ. म्हणाले.
चौकट
म्युकरमायकोसिस : मधुमेहींना सतर्कतेची गरज
कोविडनंतर आता म्युकरमायकोसिस हा आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. या आजारावरील इंजेक्शनचा पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही. असे असले तरी याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष करून ज्यांना मधुमेहाचा आजार आहे, अशा रुग्णांनी डोके दुखणे, डोळे तसेच नाकाजवळ काळे डाग पडणे, दातांमध्ये प्रचंंड वेदना होणे अशी लक्षणे दिसल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला घ्यावा, विशेष करून मधुमेह असलेल्या आणि कोरोना झालेल्या रुग्णांनी अधिक जागृत राहणे गरजेचे आहे.
डॉ. कैलास सचदेव