पोलिसांच्या मारहाणीत आरोग्य कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:40+5:302021-04-13T04:28:40+5:30

जालना : बदनापूर येथून लसीकरणाचे काम संपल्यानंतर घरी परतत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यास पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याने तो किरकोळ जखमी ...

Health workers injured in police beating | पोलिसांच्या मारहाणीत आरोग्य कर्मचारी जखमी

पोलिसांच्या मारहाणीत आरोग्य कर्मचारी जखमी

जालना : बदनापूर येथून लसीकरणाचे काम संपल्यानंतर घरी परतत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यास पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे.

आरोग्य कर्मचारी सुभाष राठोड व अन्य दोन ते तीन महिला नूतन वसाहत मधून सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी मोबाईलवर बोलत असलेल्या राठोड यांना अचानक आलेल्या पोलिसांनी तीन ते चार लाठ्यांनी मारहाण केली. आपण आरोग्य कर्मचारी आहोत आणि बदनापूर येथून लसीकरण करून आलो असल्याचे पोलिसांना सांगेपर्यंत पाठीत आणि कंबरेत मारल्या. यामुळे राठोड हे किरकोळ जखमी झाले आहे. गळ्यात ओळखपत्र असतानाही पोलिसांनी मारहाण केल्याने आरोग्य कर्मचारी संतापले आहेत.

या घडलेल्या प्रकारासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, सायंकाळी सात वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत. त्यानंतर सायंकाळी सूचना देऊनही ऐकत नसल्याने किरकोळ धाक दाखवावा लागतो. त्यातच राठोड हे या लाठी हल्ल्यात सापडले. हेतूपूत्सर ही मारहाण केली नसल्याचे सांगितले.

Web Title: Health workers injured in police beating