नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला

By दिपक ढोले  | Updated: August 31, 2022 16:35 IST2022-08-31T16:35:15+5:302022-08-31T16:35:27+5:30

धारकल्याण पाटीजवळ आल्यावर जालन्याकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने  कारला जोराची धडक दिली.

He came to his uncle with a new car, but the journey back cost the young man's life | नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला

नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला

जालना : भरधाव आयशरने कारला धडक दिल्याची घटना जालना तालुक्यातील धारकल्याण पाटीजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यात कृष्णा ज्ञानेश्वर कळकुंबे (२४ रा. जळगाव, ता. जि.जालना) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

कृष्णा हा मामाच्या गावाला गेला होता. तो बुधवारी सकाळी नाव्हा येथून जालन्याकडे कारने येत होता. धारकल्याण पाटीजवळ आल्यावर जालन्याकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने  कारला जोराची धडक दिली. यात कृष्णा गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाला होता. ग्रामस्थाने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. 

शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीट अंमलदार रामेश्वर काकड यांनी दिली. दरम्यान, कृष्णाने महिन्याभरापूर्वीच कार खरेदी केली होती, अशी माहिती मित्रांनी दिली.

Web Title: He came to his uncle with a new car, but the journey back cost the young man's life