ग्राहक म्हणून आला अन् हातचालाखीने सोन्याच्या चार बांगड्या घेऊन गेला

By दिपक ढोले  | Updated: August 23, 2022 18:07 IST2022-08-23T18:06:52+5:302022-08-23T18:07:26+5:30

सहा तोळे वजनाच्या चार बांगड्या चोरून नेल्याची घटना जालना शहरातील महावीर चौक परिसरात उघडकीस आली.

He came as a customer and looted four gold bangles | ग्राहक म्हणून आला अन् हातचालाखीने सोन्याच्या चार बांगड्या घेऊन गेला

ग्राहक म्हणून आला अन् हातचालाखीने सोन्याच्या चार बांगड्या घेऊन गेला

जालना : ग्राहक म्हणून आलेल्या एका भामट्याने हातचालाखीने २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या चार बांगड्या चोरून नेल्याची घटना जालना शहरातील महावीर चौक परिसरात मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सरला प्रकाश मेहता यांचे शहरातील महावीर चौक परिसरात जे. एम. प्रकाश ॲण्ड कंपनी नावाचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या दुकानात एकट्याच होत्या. त्याच वेळी अनोळखी व्यक्ती ग्राहक म्हणून आली. तो फिर्यादीला म्हणाला, तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून द्या, मी सोनार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात बरकत येईल, असे म्हटल्यानंतर फिर्यादीने बांगड्या काढून दिल्या. हातचलाखीने तो भामटा २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या चार बांगड्या घेऊन गेला. 

याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सरला प्रकाश मेहता यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. सुडके हे करीत आहेत.

Web Title: He came as a customer and looted four gold bangles