भोकरदन परिसरात गारपीट; रब्बी पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:27 IST2021-02-18T16:23:14+5:302021-02-18T16:27:52+5:30
Hailstorm in Bhokardan area भोकरदन, इब्राईमपूर, मुठाड, आव्हाना, गोकुळ, पेरजापुर, नांजा, सुभानपूर, आलापूर, मलकापूर, वाडी बु, वाडी खु, फत्तेपुर, मानापूर, विरेगाव या परिसरात गारपीट

भोकरदन परिसरात गारपीट; रब्बी पिकांच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल
भोकरदन : भोकरदन परिसरात गुरुवारी ( दि. १८ ) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा पाऊस झाला. अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतात सर्वत्र गारांचा खच साचला आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा सिड्स, हरबरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील भोकरदन, इब्राईमपूर, मुठाड, आव्हाना, गोकुळ, पेरजापुर, नांजा, सुभानपूर, आलापूर, मलकापूर, वाडी बु, वाडी खु, फत्तेपुर, मानापूर, विरेगाव या परिसरात गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला..
सकाळपासून कडक ऊन जाणवत होते. मात्र, दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर लगोलग 3 वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह बोराच्या आकाराच्या गाराचा वर्षाव सुरू झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट व पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते. त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील गहू, कांदा सिड्स, हरबरा, मका या पिकांचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काढणीला आलेले पिकाचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.