भोकरदनमध्ये कर्नाटकातून आलेला ५५ लाखाचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:14 PM2020-05-13T16:14:17+5:302020-05-13T16:15:18+5:30

यावेळी गुटखा व २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Gutkha worth Rs 55 lakh from Karnataka seized in Bhokardan | भोकरदनमध्ये कर्नाटकातून आलेला ५५ लाखाचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात

भोकरदनमध्ये कर्नाटकातून आलेला ५५ लाखाचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात

Next

 भोकरदन : कर्नाटकातून बुलढाणा जिल्हयातील मलकापूरकडे गुटख्याच्या ५० गोण्या (मोठ्या) घेऊन जाणारा एक ट्रक हसनाबाद पोलिसांनी तपोवन पाटीजवळ मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पकडला. जालना ते भोकरदन रस्त्यावर पकडलेल्या या गुटख्याची किंमत ५५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी गुटखा व २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत सपोनि मारोती शेळके यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री एका आरोपीला अटक करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी जालना ते भोकरदन रोडवर सापळा लावला होता. याच दरम्यान,जालन्याकडे एक ट्रक भरधाव वेगाने  येतांना दिसली. तिला अडवून तपासणी करण्यात आली असता त्यात गुटख्याच्या ५० मोठ्या गोण्या आढळून आल्या. 

पोलिसांनी ट्रक चालक शेख अफरोज शेख शब्बीर, सय्यद सुलेमान सय्यद उस्मा  यांना ताब्यात घेऊन अन्न  व ओषध प्रशासन विभागाला माहिती आली. बुधवारी ( दि. १३ ) दुपारी १ वाजेच्या दरम्यान हे कर्मचारी हसनाबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर गुटख्याची मोजणी करून संबंधित ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
......................................
 

Web Title: Gutkha worth Rs 55 lakh from Karnataka seized in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.