२० लाख रुपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:11 IST2019-11-01T01:11:05+5:302019-11-01T01:11:38+5:30

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात एका ढाब्याजवळ बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गुटख्याने भरलेला मिनी ट्रक जप्त केला होता

Gutkha worth Rs 20 lakh seized | २० लाख रुपयांचा गुटखा जप्त

२० लाख रुपयांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील रामनगर परिसरात एका ढाब्याजवळ बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून गुटख्याने भरलेला मिनी ट्रक जप्त केला होता. या कारवाईत अंदाजे वीस लाख रुपयांच्या गुटख्यासह तब्बल ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामनगर साखर कारखाना परिसरातील एका ढाब्यावर मिनीट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशीरा छापा टाकून मिनीट्रक आणि गुटखा असा तब्बल ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सुमारे २० लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आझाद अली नवाब अली (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) व मोहंम्मद इस्माईल इकबाल (रा. फुलबाजार, जालना) यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha worth Rs 20 lakh seized