घनसावंगी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:10+5:302021-09-04T04:36:10+5:30
अंबड गटसाधन केंद्रातर्फे कार्यशाळा अंबड : शालेय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व गटसाधन केंद्राच्या वतीने ...

घनसावंगी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अंबड गटसाधन केंद्रातर्फे कार्यशाळा
अंबड : शालेय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व गटसाधन केंद्राच्या वतीने सुखापुरी व झिरपी केंद्रांतर्गत शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात डायटचे अधिव्याख्याता प्रा. जालिंदर बटूळे, विनोद राख, साधनव्यक्ती सतीश देशमुख, अशोक पवार, केंद्रप्रमुख अशोक पटेकर, म्हस्के, प्रगती बांगर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख आश्रुबा गवई यांनी केले.
शिवसंग्राम पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन
जालना : मुंबई येथे १९ सप्टेंबर रोजी शिवसंग्राम तसेच इतर मराठा संघटना आणि प्रमुख समन्वय यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजाणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरूवारी केली आहे. या निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष निलेश गोर्डे, नारायण टकले, तालुकाध्यक्ष सचिन खरात, भारत राजबिंडे, राजेश शेळके, नवनाथ राजबिंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पारनेर येथे धार्मिक कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील पारनेर येथे आरबडी भजनी मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह भांड्यावरील भजन स्पर्धा घेण्यात आल्या. यात विविध ग्रंथांचे विजेत्यांना वाटप करण्यात आले. पारनेर येथे गुरूवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पारनेर सह लालवाडी, पारनेरतांडा, मार्डी, कर्जत, शिराढाेण आदी भागातील भाविक सहभागी झाले होते.
पारध परिसरात
पिके बहरली
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पारध येथे गेल्या चार दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यातच बुधवारी सकाळपासूनच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या श्रावण सरी कोसळत होत्या. त्यामुळे परिसरातील वातावरण निसर्गरम्य होऊन वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
घनसावंगी : भोकरदन तालुक्यातील रांजणी येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे ही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांसह जनावरांनाही या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अनेक वाहन चालक अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.