शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

गट शिक्षणाधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:42 AM

गटशिक्षणाधिकाऱ्यांची जिल्ह्यात एक दोन नव्हे, पाच पदे रिक्त आहेत.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची जिल्ह्यात एक दोन नव्हे, पाच पदे रिक्त आहेत. रिक्तपदे भरण्यासाठी शासनस्तरावरून वेळाकाढूपणाचे धोरण राबविले जात असल्याने तालुकास्तरावरील कामाचा भार विस्ताराधिकायांच्या खांद्यावर पडला असून, शिक्षणाचा बोजवारा उडत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५५१ शाळा आहेत. यामध्ये साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्याची शैक्षणिक जबाबदारी संपूर्णपणे गटशिक्षणाधिकायांची असते. मात्र शासनाकडून ही पदे न भरल्यामुळे जिल्ह्यात विस्तार अधिका-यावर जबाबदारी सोपवून प्रभारी राज सुरु आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिक्षक, तसेच इतर कर्मचायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमुख नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, एकीकडे शासन जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची वल्गना करते. तर दुसरीकडे शिक्षण विभागातील महत्वाचे असलेले गटशिक्षणाधिका-याचे पद भरण्यास कानाडोळा करत आहे. ही पदे भरल्यास जिल्हा परिषद शाळांचे रुपडे बदलू शकते तसेच शाळेच्या गुणवत्तेतही सुधारणा होऊन तालुका प्रशासनात गतिमानता येण्यास मदत होईल. सध्या परतूर, घनसावंगी, मंठा, आणि जालना पाचही तालुक्याचा प्रभारी कारभार विस्तार अधिका-याकडे आहे. अगोदरच तालुक्यात ५० टक्के विस्तार अधिका-यांची पदे रिक्त असतांना त्यांच्याकडे पुन्हा गटशिक्षणाधिका-याचा भार दिल्याने शालेय गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. जेथे नाही कारभारी म्हणून दिला जातो कारभारी अशी म्हण आहे. शासनाने जिल्ह्यातील गटशिक्षणाधिका-यांचे रिक्त पदे भरल्यास जिल्हा परिषद शाळांकडे समाजाचा, पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. परंतु, जि.प. जालनाकडून पाठपुरावा होत नसल्याचे वास्तव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.पालकमंत्र्यांच्या तालुक्यात प्रभारीराजपालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या परतूर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद वर्षभरापासून रिक्त आहे. तसेच विविध शासकीय कार्यालयातील पदे रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामावर परिणाम होत आहे. या रिक्त जागांमुळे सामान्य माणसांची कार्यालयीन कामे अनेक वेळा खोळंबत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. तसेच आमदार संतोष दानवे यांचा मतदार संघ असलेला जाफराबाद तालुक्यात तर गटशिक्षणाधिकाºयांचा पदभार सहायक गटविकास अधिका-याकडे देण्यात आलेला आहे.५० टक्के विस्तार अधिका-यांची पदे रिक्तप्रत्येक तालुक्याला एक गटशिक्षणाधिकारी आणि त्यांना मदत करण्यासाठी केंद्राअंतर्गत तीन विस्तार अधिकारी असतात. मात्र, गेल्या तीन वर्षापासून विस्तार अधिका-यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. तर काही विस्तार अधिका-यांकडे गटशिक्षणाधिका-यांचा प्रभारी पदभार दिलेला आहे.कार्यालयीन कामामुळे तालुक्यातील शाळांची नियमित तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा निवड मंडळाकडून विस्तार अधिका-यांची पदे भरण्यात येते. मात्र, याकडे मंडळाच्या पदाधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षणाबाबत पदाधिकारी किती गंभीर आहेत, हे यावरुन दिसून येते.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र