वाजपेयी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:33+5:302020-12-28T04:16:33+5:30
शेतकऱ्यांची गैरसोय घनसावंगी : महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी शेतातील ...

वाजपेयी यांना अभिवादन
शेतकऱ्यांची गैरसोय
घनसावंगी : महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी काही दिवस दिवसा आणि काही दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्यावेळी शेतातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय हिंस्त्र प्राण्यांचा वावरही तालुक्यात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय पाहता दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
वीज ग्रहाकांची जागृती
अंबड महावितरण कंपनीच्या वतीने ‘एक गाव एक दिवस’ उपक्रमांतर्गत शहरातील वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकूण घेत त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबिवण्यात आला. यावेळी सहायक अभियंता समीर धोपेकर, प्रधान तंत्रज्ञ अशोक गाढे, विष्णू जाधव, जालिंदर साबळे, प्रफुल्ल वाकोडे, अशोक भेंडूळकर आदींची उपस्थिती होती.