रुग्ण आणि मृत्यू संख्येचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST2021-08-27T04:32:51+5:302021-08-27T04:32:51+5:30

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक होती; परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये ...

The graph of patient and death numbers dropped | रुग्ण आणि मृत्यू संख्येचा आलेख घसरला

रुग्ण आणि मृत्यू संख्येचा आलेख घसरला

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक होती; परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे या आजाराची भीती हळूहळू कमी होत आहे. असे असतानाच तज्ज्ञांकडून मात्र तिसऱ्या लाटेची भीती आणखी गडद असल्याचे दर्शविले जात असल्याचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकूणच जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी सर्वत्र घबराट पसरली होती; परंतु हळूहळू या आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती अधिक झाल्याने आजाराची तीव्रता कमी झाली आहे.

साधारण ऑगस्ट २०२० मध्ये २१४७६ चाचण्या केल्या होत्या, त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय होते. डिसेंबरमध्ये या चाचण्यांचे प्रमाण कमी होऊन रुग्णसंख्याही घटली होती; परंतु नंतर जानेवारी २०२१ मध्ये चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार एप्रिल आणि मे मध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ६० हजारपेक्षा अधिक चाचण्या झाल्या असून, त्यातून ६०४३६ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

चौकट

कोरोनामुळे ११८६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात कोरोनामुळे ११८६ जणांचा मृत्यू हा २५ ऑगस्टपर्यंत झाला आहे. यात अंबड १३७, बदनापूर ६१, भोकरदन ७५, घनसावंगी ९४, जाफराबाद ६३, सर्वाधिका मृत्यू हे जालना तालुक्यात झाले असून, त्यांची संख्या ४२० एवढी आहे. मंठा ५२, परतू ७४ आणि अन्य २१० असे एकूण ११८६ बळी गेले आहेत. यामध्ये ७५७ पुरुष तर ४२९ महिलांचा समावेश आहे.

Web Title: The graph of patient and death numbers dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.