लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:54 IST2018-08-07T00:53:39+5:302018-08-07T00:54:10+5:30
बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे विहीर बांधकामाच्या चेकवर सही करण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकांला लाच लुचपत विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
तक्रारदारच्या वडिलांची हिवरा राळा शिवारात गट नं. २६४ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदली. याच बांधकामांच्या चेकवर सही देण्यासाठी ग्रामसेवक भाऊसाहेब मच्छिंद्र वरडूले (वय.४८) यांनी २ हजारांची लाच माघितली. त्यानंतर त्यांनी लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली. लाच लुचपत विभागाने सापळा रुचून ग्रामसेवक भाऊसाहेब वरडूले यांना १५०० रुपयांची लाच स्वीकारत असतांना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे यांच्यासह आदींनी केली.