ग्रा.पं. सदस्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:51 IST2019-05-07T00:50:39+5:302019-05-07T00:51:09+5:30
ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला.

ग्रा.पं. सदस्यांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : ग्रामपंचायत च्या मासिक बैठकीची नोटीस सदस्यांना देऊन नोटीस देणारे ग्रामविकास अधिकारी बैठकीस हजर राहिले नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायतला सोमवारी टाळे टोकून रोष व्यक्त केला.
मागील तीन महिन्यापासून गावात भागवत तंबरे हे काम करीत आहेत. परंतु वारंवार ग्राम सेवक गैरहजर राहत असून त्यामुळे गावातील समस्या कशा सोडवाव्यात, असा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी यावेळी केला. कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायत नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत आहे. सुरवातीला ग्रामसेवक हजर राहत नसल्याचे कारण सांगत होते. आता नवीन ग्रामसेवक रुजू होऊनही गावातील समस्या कायम आहेत.
गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत ने कुंभार पिंपळगावात कुठलाही व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाकडून १०० रुपये वसूल करण्यात आले असल्याने अनेक व्यापारी रोष व्यक्त करत आहेत. या संदर्भात सरपंच , ग्रामसेवक यांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठकीसाठी सर्व सदस्यांना नोटीस पाठवून बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे सर्वजण सकाळ पासून उपस्थित झाले. सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांची त्यांनी दुपारी एक वाजेपर्यंत वाट पाहिली. परंतु ते न आल्याने, संतप्त ग्रा.प.सदस्य अंकुश रोकडे, शिवाजी कंटुले, भुजंग कंटुले, शेख बुठण शेख गुलाब, शेख राजू शेख नबी, नामदेव राऊत, नानाभाऊ महानोर, अशोक उंदावत (पंचायत समिती सदस्य) व ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयास कुलूप ठोकले. या प्रकारामुळे दिवसभर गावात चर्चेला उधाण आले होते.