शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उपसामुळे दोन वर्षांत शासनाचे बुडले ६ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:17 IST

भोकरदन तालुक्यात अवैध वाळु उपसामुळे शासनाचे मागील दोन वर्षात जवळपास ६ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देलिलाव होणे गरजेचे : पावसामुळे भोकरदनच्या नद्यांमध्ये वाळूचा साठा

भोकरदन : भोकरदन तालुक्यात अवैध वाळु उपसामुळे शासनाचे मागील दोन वर्षात जवळपास ६ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यातच यावर्षी भोकरदन तालुक्यातील सर्वच नद्यांना पाणी आल्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली आहे. अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी तालुक्यातील सर्वच नद्यातील वाळू पट्यांचा लिलाव करणे गरजेचे आहे़तालुक्यातील पुर्णा, गिरजा, केळना या नद्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा उपसा करण्यात येतो. कोरड्या दुष्काळामुळे नद्यांना दोन ते तीन वर्षांपासून मोठे पूर आले नाही. त्यामुळे वाळू माफियांनी या तिनही नद्यांचे पात्र अक्षरश: पोखरून काढले होते. परिणामी, नदीच्या पात्रात वाळुच दिसत नव्हती. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होते.यावर्षी भोकरदन तालुक्यात परतीच्या पावसात पुर्णा, गिरजा, जुई, केळना, धामणा या नद्यांना मोठे पूर आले. त्यामुळे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा आला आहे. नद्यांमध्ये वाळुसाठा आल्याने वाळू माफियात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. सध्या नद्यांतून अवैध वाळू उपसाही सुरू आहे. परिणामी, यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे गौण खनिजाचे उत्पन्न बुडत आहे.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भोकरदन तालुक्यातील नद्यांमधील वाळु पट्यांचा लिलाव करून अवैध वाळू उपशाला लगाम लावण्याची मागणी करण्यात येत आहे़दोन वर्षांपासून लिलाव बंदतालुक्यातील नद्यांमधील वाळू पट्याचे दोन वर्षांपासून लिलाव झाले नव्हते. मात्र यावर्षी सर्व ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तालुक्यातील अवैध वाळु उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भोकरदन तालुक्यात गौण खनिजाच्या माध्यमातुन शासनाला ३ कोटी रुपयापर्यंत महसुली उत्पन्न मिळते. ते दोन वर्षात मिळाले नसल्याचे तहसीलदार संतोष गोरड यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग