शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! रेशीम अंडीपुंज केंद्र ठरणार मराठवाड्यासाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 8:00 PM

बीड जिल्हा आजघडीला मराठवाड्यात अव्वल असून, तेथे दोन हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ही शेती केली जाते

ठळक मुद्देजालन्यात देशातील दुसरे कोष खरेदी केंद्रअंडीपुंज ककेंद्रासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद

जालना/ औरंगाबाद : अत्यंत कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. मराठवाड्यात बीड, औरंगाबाद तसेच जालना आणि परभणी हे जिल्हे यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील पहिले अंडीपुंज केंद्र हे औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे होत असून, ते मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे. 

महाराष्ट्रात रेशीम शेतीचा प्रारंभ जवळपास पाच दशकांपूर्वी झाला. आजघडीला जवळपास २८ जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणावर रेशीम शेती केली जाते. लहानात लहान शेतकरीदेखील ही शेती अत्यंत कमी पाण्यावर करता येत असल्याने त्याकडे वळला आहे. मध्यंतरी मराठवाड्यातही या रेशीम शेतीसाठी वस्त्र उद्योग विभागाने पुढाकार घेतला होता. नंतर या शेतीचे महत्त्व विशेषकरून ग्रामीण भागातील महिलांना कळल्याने त्या या शेतीकडे वळल्या आहेत. रेशीम निर्मितीसाठी तुतीची लागवड करून त्यातून निघणाऱ्या अळींचे संगोपन तसेच त्यांचे सरंक्षण हे सोप्या पद्धतीने केले जाते. केवळ तापमान वाढीचा आणि कमी होण्याचे तंत्र सांभाळल्यास ही शेती परवडणारी असून, जालना जिल्ह्यात ही शेती जवळपास ९०० एकरपेक्षा अधिक आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात ही शेती एक हजार ३०० एकरांवर केली जाते. बीड जिल्हा आजघडीला मराठवाड्यात अव्वल असून, तेथे दोन हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ही शेती केली जात असल्याची माहिती उपसंचालक प्रादेशिक रेशीम विकास यंत्रणेचे डी. ए. हागे यांनी दिली.

जालन्यात देशातील दुसरे कोष खरेदी केंद्रमहाराष्ट्रातील रेशीम कोष निर्मितीनंतर ते कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते; परंतु तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, तत्कालीन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खेातकर यांनी पुढाकार घेऊन जालन्यातील कृषी बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. येथे आज या रेशीम कोषाला चांगला भाव मिळत असून, ३७६ रुपये प्रती किलाेने आज कोषाची खरेदी येथे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्नाटकला जाण्यासाठीचा मोठा वेळ आणि पैसा वाचला आहे. लवकरच जालन्यात या रेशीम कोष खरेदीसाठी सहा कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

अंडीपुंज केंद्र वरदान ठरणारराज्याच्या अर्थसंकल्पात सोमवारी चिकलठाणा येथे अंडीपुंज केंद्र अर्थात ग्रेनेज मंजूर केले आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. येथे यासाठी कोल्डस्टोरेज-शीतगृह उभारण्यात येणार असून, तेथे अंडी उबविली जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण तज्ज्ञांकडून देण्याची व्यवस्थाही येथे होणार असल्याने हे अंडीपुंज केंद्र मराठवाडा विभागासाठी वरदान ठरणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीArjun Khotkarअर्जुन खोतकरMarathwadaमराठवाडा