शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानप्रसाद भारूका यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

कडेगाव येथे अभिवादन जालना : श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कडेगाव येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन ...

कडेगाव येथे अभिवादन

जालना : श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कडेगाव येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश कोल्हे, सुभाष खाडे, चंद्रकांत खाडे, विष्णू खाडे, संदीप मोरे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, कृष्णा निंबाळकर, रामेश्वर निंबाळकर आदी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना मोफत मास्कवाटप

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच बाबासाहेब सोमधाने, देविदास सोमधाने, गोपाळ खरात, मोकीदा खरात, मुख्याध्यापक सिद्धार्थ गजभिये, राजू वाडेकर, भागवत म्हस्के, संजय खरात, राजेंद्र खरात, अमोल खरात, परमेश्वर खरात, राजू खरात, सिद्धार्थ गवई, संतोष खरात, प्रकाश मानसुरे, विकास सोनुने, सुशील भोरजार, सीमा उबाळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा वकील संघाची सर्वसाधारण सभा

जालना : जालना जिल्हा वकील संघाची सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी दोन वाजता नूतन ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा वकील संघाच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या सभेत या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती ॲड.अरविंद मुरमे यांनी दिली.

अनिरुद्ध उढाण यांना पीएच.डी

जालना : शहरातील अंकुशराव टोपे कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ.अनिरुद्ध उढाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापिठातील विद्या वाचस्पती (पीएच.डी) ही पदवी बहाल करण्यात आली आहे. याबद्दल डॉ.बी.आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. आर. जे. गायकवाड, रमेश भुतेकर यांनी कौतुक केले आहे.

बोडखा येथे निधी संकलनासाठी रॅली

जालना : घनसावंगी तालुक्यातील बोडखा बु. येथे श्रीराम मंदिर बांधकाम निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी गावातून निधी संकलित केला. गावातील मंदिरापासून सुरू झालेल्या या रॅलीने तमाम बोढखाकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीच्या माध्यमातून बोडखाकरांनीही मंदिर उभारणीसाठी सढळ हाताने निधी दिला आहे.

बदनापूर येथे एमआयएमचा मेळावा

बदनापूर : बदनापूर येथे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या अध्यक्षतेखाली एमआयएमचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सय्यद इम्रान यांच्या प्रयत्नाने शेकडो कार्यकर्त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यात अशोक अंबिलढगे, मोबिन पटेल, फैय्याज पठाण, जावेद कुरेशी, फिरोज पठाण, अज्जूभाई आदीची उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष युनूसभाई यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.

शांतिनिकेतन शाळेत हुतात्मा दिन साजरा

जालना : शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, अंबादास घायाळ आणि संजय खरात यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सूर्यकांत बेले, अशोक माधवले, मोहन भदाडे, शिवहरी मांटे, सुनीता खरात, अमोल पवार, गजानन दळवी, अर्चना भालेराव, शिवराम गिराम, रमेश गाढवे आदी उपस्थित होते.

हरवलेली स्कुटी बेवारस सापडली

गोंदी : औरंगाबाद येथील सातारा परिसरातील रहिवासी अजय अंकुश नलावाडे यांची साडेतीन वर्षांपूर्वी हरवलेली स्कुटी गोंदी पोलिसांना रात्रीच्या गस्तीदरम्यान वडीगोद्री शिवारात बेवारस सापडली. ती गोंदी पोलिसांनी मूळ मालकाला परत केली. सदर स्कुटी आढळल्यानंतर अपुऱ्या पत्त्यामुळे मालक सापडत नव्हता. नंतर शोध घेतला असता, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद असल्याचे समजले. त्यानंतर, स्कुटी देण्यात आली.

टेंभुर्णी येथे बालकांना पोलिओ डोस

टेंभुर्णी: टेंभुर्णी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ० ते ५ वर्षांच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. येथील पोस्ट ऑफिसजवळ असलेल्या बुथवर एका बालिकेला पोलिओ डोस पाझण्यात आला.