कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 17:42 IST2021-09-16T17:41:51+5:302021-09-16T17:42:07+5:30
एक महिला आणि मुलगी तळ्यात बुडाली

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू
अंबड (जि. जालना) : धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी रामनगर तांडा (ता. अंबड, जि. जालना) शिवारात घडली. पूनम मारोती कोळेकर असे मृत मुलीचे नाव आहे.
रामनगर तांडा येथील पूनम कोळेकर ही मुलगी गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेसमवेत गावच्या शिवारातील तळ्यात धुणे धुण्यासाठी गेली होती. परंतु, अचानक त्या दोघी तळ्यात बुडाल्या. यावेळी लहान मुलांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोघींना पाण्याच्या बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, पूनम कोळेकर या मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुसऱ्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास बीट अंमलदार प्रताप चव्हाण करीत आहेत.