फतेपूर शिवारात मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:11 IST2018-04-17T01:11:29+5:302018-04-17T01:11:29+5:30

जोमाळा शिवारात १४ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अंजली प्रकाश पवार, असे मृत मुलीचे नाव आहे.

Girl Suicide in Fatepur Shivar | फतेपूर शिवारात मुलीची आत्महत्या

फतेपूर शिवारात मुलीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील जोमाळा शिवारात १४ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अंजली प्रकाश पवार, असे मृत मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
अंजली सपकाळ (रा़ जळगावसपकाळ) भोकरदन येथील लक्ष्मीनगर भागातील भास्कर पवार (मावसा) यांच्याकडे राहत होती. शहरातील मराठवाडा मॉडेल स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होती.
शनिवारी सायंकाळी सहावाजल्यापासून ती घरातून गायब होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही अंजली आढळून न आल्याने नातेवाइकांनी रविवारी भोकरदन पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जोमाळा शिवारातील श्रीनिवास गायकवाड यांच्या विहिरीमध्ये अंजलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीयतपासणी केल्यानंतर अंजलीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केल्यानंतर सदर मुलीवर भोकरदन येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंजलीने आत्महत्या केली की, हा घातपात आहे, या दृष्टीेने तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक वैशाली पवार यांनी सांगितले.

Web Title: Girl Suicide in Fatepur Shivar