प्रतिभा वैद्य यांचा सत्कार
जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष निरीक्षक प्रतिभा वैद्य यांचा जालना येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, शहराध्यक्ष शेख शाजीया आदींची उपस्थिती होती.
नागरिकांची गैरसोय
बदनापूर : शहरातील बसस्थानक व परिसरातील मुख्य रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बोर्डे यांचा सत्कार
दाभाडी : येथील शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधाकर बोर्डे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी बोर्डे यांनी शाळेतील कामकाजाचे अनुभव कथन केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.