गॅस सिलेंडरच्या स्फोटात सिपोरा येथे घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:06 AM2019-01-15T01:06:52+5:302019-01-15T01:07:28+5:30

सुतार गल्लीतील अरुण गणपत सोनवणे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून गेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

 In the gas cylinder explosion, the house was destroyed at Sipora | गॅस सिलेंडरच्या स्फोटात सिपोरा येथे घर भस्मसात

गॅस सिलेंडरच्या स्फोटात सिपोरा येथे घर भस्मसात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिपोरा बाजार : येथील सुतार गल्लीतील अरुण गणपत सोनवणे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून गेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यात अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
सोनवणे पती - पत्नी सोमवारी घराला कुलूप लावून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या घरातील गॅसचा मोठा स्फोट होऊन घराला लाग लागली. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घरावरील पत्रे उडाले होते. आगीचे रौद ्ररूप धारण केल्याने आग विझविण्यास कोणीच धजावत नव्हते. आग लागल्याची माहिती भोकरदन येथील अग्निशमन दलाला देण्यात आली होती. मात्र आग इतरत्र पसरु नये म्हणून ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात ठेवली. अग्निशमन बंब आल्यावरही त्याला त्या घरापर्यंत पोहोचता आले नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  In the gas cylinder explosion, the house was destroyed at Sipora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireHomeआगघर