श्रीकृष्णनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:33 IST2019-07-22T00:33:04+5:302019-07-22T00:33:28+5:30

श्रीकृष्णनगर (जामवाडी) येथील एका घरातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली. तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले.

Gas Cylinder blast in Srikrishna Nagar | श्रीकृष्णनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

श्रीकृष्णनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील श्रीकृष्णनगर (जामवाडी) येथील एका घरातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली. तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
श्रीकृष्णनगर (जामवाडी) येथील सुलताना सलीम खान (४५) यांच्यासह नजमा सलीम खान (१६), अमजद सलीम खान (२२) हे रविवारी सायंकाळी घरात होते. त्यावेळी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला गळती लागली. यामुळे भयभीत झालेल्या घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतली. यादरम्यान गॅससिलेंडरचा स्फोट झाला. यात नजमा सलीम खान ही गंभीर जखमी झाली. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर ग्रामस्थांनी खान यांच्या घराकडे धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. घटनेचा तलाठी शिवाजी घुगे यांनी पंचनामा केला.

Web Title: Gas Cylinder blast in Srikrishna Nagar