ऑटोपार्ट दुकानासह गॅरेजला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST2021-02-21T04:56:06+5:302021-02-21T04:56:06+5:30

ॲड.कोल्हे यांचा सत्कार जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक ...

Garage fire with autopart shop | ऑटोपार्ट दुकानासह गॅरेजला आग

ऑटोपार्ट दुकानासह गॅरेजला आग

ॲड.कोल्हे यांचा सत्कार

जालना : जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी ॲड.दीपक कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप

जालना : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ जयंती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी पांजरपोळ गोशाळेत चारावाटप करण्यात आला. यावेळी रवींद्र राऊत, सुभाष देवीदान, रवींद्र डुरे, सतीश जाधव, विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर, अंकुश राऊत, दिगंबर पेरे आदींची उपस्थिती होती.

आगार प्रमुखांना विविध मागण्यांचे निवेदन

आष्टी : परतूर तालुक्यातील फुलवाडी ते आष्टी मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या मागणीचे निवेदन परतूर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांना देण्यात आले. या निवेदनावर महादेव वाघमारे, सोपान वाघमारे, परमेश्वर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ वाघमारे, नागनाथ वाघमारे, केशव वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी

जालना : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी विश्वंभर कुलकर्णी, संघटकपदी विनोद पाटील, सहसंघटकपदी शालिनी पुराणिक यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा ग्राहक पंचायत जालनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे, सचिव महेश धन्नावत, जिल्हा संघटक संजय देशपांडे, अ‍ॅड.शुभम भारुका, डॉ.दिलीप लाड, मो.नूर आदी उपस्थित होते.

क्षयरोगमुक्तीवर विशेष कार्यक्रम

भोकरदन : केदारखेडा येथील श्री रामेश्वर विद्यालयात क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम.एन. सुटे, एस.एस. खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्ही.एन. धसाळ, के.के. सोरमारे, पी.बी. इंगळे, नितीन तळेकर, संदीप पोटे, केशव खेडेकर, विजय वाघ, श्रीराम मुरकुटे, मिलिंद सावंत, आर.के. जाधव, विनोद तांगडे, टी.आर. फोलाने आदी उपस्थित होते.

कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांनी सक्तीच्या कर्जवसुलीला सुरुवात केली आहे. वसुली पथके थेट कर्जदाराच्या घरी जाऊन वसुली करीत असल्याने कर्जदार त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या काळात तब्बल सहा महिने उद्योग, कामधंदे बंद होते. त्यातच आता विजेचे बिल, कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी कर्जदारांनी केली आहे.

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

जळगाव सपकाळ: येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रार देऊनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जळगाव सपकाळ येथे संपूर्ण गावात पाच ठिकाणी सिंगल फेज रोहित्र बसविण्यात आले आहेत. पाच रोहित्रांपैकी दररोज अथवा दिवसाआड कोणत्या ना कोणत्या ठिकाणचे रोहित्र जळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालय त्रस्त झाले आहे.

Web Title: Garage fire with autopart shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.