मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST2021-09-04T04:36:27+5:302021-09-04T04:36:27+5:30
आष्टी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा जालना : आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील हस्तुरतांडा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर ...

मोबाईलच्या माध्यमातून फसवणूक
आष्टी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
जालना : आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील हस्तुरतांडा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळत असलेले संशयित अख्तर इब्राहिम खां पठाण (रा. आष्टी), पंढरीनाथ शेषराव राठोड, रवींद्र सुदाम आढे (रा. हस्तुरतांडा), डिगांबर दामोधर रासवे, अरुण अंकुश चव्हाण (रा. सावरगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांकडून जुगार साहित्यासह पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार मुंढे अधिक तपास करत आहेत.
वाळू वाहतूूक करणारे तीन ट्रक्टर पकडले
जालना : घनसांवगी तालुक्यातील कोठी ते मंगरूळ महामार्गावर गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी शुक्रवारी पकडले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकांविरुध्द जमादार नारायण माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीर्थपुरी पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक डी. डी. लंके, शिंदे, अवचर यांनी ही कारवाई केली.