चौघांचा मृत्यू, ४५२ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:14+5:302021-03-16T04:31:14+5:30

जालना : गत आठवड्यापासून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चौघांचा सोमवारी मृत्यू ...

Four killed, 452 injured | चौघांचा मृत्यू, ४५२ जणांना बाधा

चौघांचा मृत्यू, ४५२ जणांना बाधा

जालना : गत आठवड्यापासून वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चौघांचा सोमवारी मृत्यू झाला, तर तब्बल ४५२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात जालना शहरातीलच तब्बल २७७ जणांचा समावेश आहे.

सूचनांचे उल्लंघन सर्रास होत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्यात सोमवारी तब्बल ४५२ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये जालना शहरातीलच २७७ जणांचा समावेश आहे. त्याशिवाय विरेगाव- १, निरखेडा -१, पुतळी-२, भिलपुरी -१, मौजपुरी -३, बोरगाव- १, हिवरा रोशनगाव -२, हिसवन -१, सिरसवाडी -१, दरेगाव -१, सावरगाव -१, वाघ्रुळ येथील एकाला बाधा झाली आहे. मंठा शहर -२, पाटोदा -२, मोसा -४, परतूर शहर -१३, वरफळवाडी -१, अंबा -१, वाटुर -२, दैठणा येथील १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री -१, बोरगाव -१, कुंभार पिंपळगाव -३, राणी उंचेगाव -१, अंतरवाली -९, रावणा -२, मुरमा -१, मंगू जळगाव -१, अंबड शहर -१०, जामखेड -१, मठ पिंपळगाव -१, भालगाव -१, राहुवाडी -१, झिरपी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदनापूर शहर -१४, बाजार वाहेगाव -१, वाकुळणी -२, आडेगाव -१, किन्होळा -३, दाभाडी -१, शेलगाव -१, ढोकसाळ -१, सोमठाणा -१, मांजारगाव -१, दावलवाडी -१, आसोला -१, जाफराबाद शहर -८, डोणगाव -१, सावरखेडा -१, खासगाव -१, अकोलादेव -२, जानेफळ -१, गोंदणखेडा -२, भराडखेडा -१, जवखेडा येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. भोकरदन शहर -८, तळेगाव -३, दानापूर -१, गारखेडा -१, लेहा -१, कुंभारी -१, कल्याणी -७, जवखेडा -१, वालसावंगी -१, चिंचोली -१, ढोरखेडा -१, केदारखेडा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर जिल्ह्यातील बुलडाणा -६, औरंगाबाद -२, परभणी -१, यवतमाळ येथील २ अशा एकूण ३९२ जणांचा आरटीपीसीआरद्वारे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ॲण्टीजेन तपासणीद्वारे ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

३६५ जण कोरोनामुक्त

कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा सोमवारी मृत्यू झाला. तर, रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर ३६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १८ हजार ८२९ वर गेली असून, त्यातील ४१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आजवर १७ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात १३५० ॲक्टिव्ह रुग्ण

कोविड रुग्णालयात सध्या १३५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुनर्पडताळणीसाठी ४४५ नमुने पाठविण्यात आले असून, एकूण तपासणीतील नमुन्यांपैकी १०९६ अहवालांची प्रतीक्षा आहे.

Web Title: Four killed, 452 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.