मतभेद विसरा - सुरेश जेथलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:15 IST2018-08-14T01:15:06+5:302018-08-14T01:15:33+5:30
काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.

मतभेद विसरा - सुरेश जेथलिया
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.
जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी भोकरदन येथे जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर माजी आ. धोंडीराम राठोड, माजी आ. संतोष दसपुते, जिल्हा कॉग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, विलास औताडे, अब्दुल हाफीज, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, सत्संग मुंढे, ज्ञानदेव बांगर, प्रभाकर पवार, कल्याण दळे, आऱआरख़डके आदी उपस्थित होते.
ज्या तालुक्यात कॉग्रेस पक्षाची ताकद कमी झाली आहे, अशा तालुक्यात कॉग्रेस पक्षाच्या वतीने पक्षवाढीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वानी आपापसातील असलेले मतभेद विसरून पक्ष बळकटीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे जेथलिया म्हणाले.यासाठी राज्य कॉग्रेस कमिटीकडून हवे ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेश काळे, ज्ञानेश्वर भांदरगे, विठ्ठल राजपूत, राजेंद्र राख, नीळकंठ वायाळ, त्र्यंबकराव पांबळे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, सुरेश गवळी, युवक कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल देशमुख, नगरसेवक संतोष अन्नदाते, शेख रिजवान, शेख जफर, अनिल देशपांडे, महेबूबखॉ पठाण, भाऊसाहेब सांळुके, श्रावणकुमार आक्से, अब्दुल रऊफ, सलीम काझी, अंजना बारोकर, विद्या वाघ, संगीता फुसे, साळुबा लोखंडे आदीसह कार्यकर्त्याची उपस्थिती होती.