शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:40 IST

जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंधश्रध्दा, हुंड्याच्या पध्दतीमुळे मुलीचा जन्म पालकांना नकोसा वाटत होता. वंशाचा दिवा ही संकल्पना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. पित्याचं नाव पुढे चालवणारी पितृसत्ताक कुटुंब पध्दती आजही स्त्रियांना कमी लेखते! परिणामी अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही मुलींचा जन्म हे संकट मानले जाते. यामुळेच की काय, मागील पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे.मुले आणि मुली यांच्या जन्मदारात असलेली किंचित नैसर्गिक तफावत स्त्रीभ्रूण हत्येमुळे की काय, २०१२-१३ पूर्वी बºयाच प्रमाणात रूंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर थेट जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाभरातील सोनोग्राफी सेंटरची एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. तसेच प्रत्येक सेंटरला कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत आदेशित केले होते. यानंतरही निर्देश पायदळी तुडविणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आजही आरोग्य यंत्रणेकडून सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली जाते. याच्या जोडीलाच शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यात आली. लिंग निदान कायद्याने गुन्हा असल्याने या वाटेला कोणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुलगाच वंशाचा दिवा ही संकल्पना काही अंशी का होईना; धूसर झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांपासून जालना येथील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी एक हजार मुलांमागे १०० मुली कामी असल्याचे समोर आले आहे.२०१५-१६ साली जिल्हा शासकीय रूग्णालयात ६ हजार ०८१ मुले जन्मली होती. त्यापैकी ३१६४ मुले तर २९१७ मुली जन्मल्या. यावर्षी १ हजार मुलांमागे ९२१ मुली होत्या. तर २०१६-१७ मध्ये ५ हजार ५७२ बालकांपैकी २८९२ मुले तर २६८० मुली जन्मल्या होत्या.यावर्षी मुलींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. २०१७-१८ मध्ये ५९३२ बालकांपैकी ३०३४ मुले तर २८९८ मुली जन्मल्या. यावर्षांत एक हजार मुलांमागे ९५५ मुली होत्या. २०१८-१९ मध्ये मुलींच्या जन्मदरात चांगलीच घसरण झाली. यावर्षी १ हजार मुलांमागे केवळ ९१० मुलीच जन्मल्या. २०१९ मध्ये एक हजार मुलांमागे केवळ ९०२ मुली जन्मल्या.जिल्ह्यात दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे. गत दोन वर्षांपासून या जन्मदरात सतत घट होत आहे. २०१८-१९ यावर्षी १ हजार मुलांमागे ९१० मुली होत्या तर २०१९ मध्ये १ हजार मुलांमागे ९०२ मुली होत्या. त्यामुळे या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात मुलींच्या जन्मदरात घट दिसून आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदारात वाढ करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. जर मुलींचा जन्मदर असाच घटत राहिला तर येणाºया काळात समाजाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे.

टॅग्स :new born babyनवजात अर्भकSocialसामाजिकFamilyपरिवार