८०० रुपयांची लाच स्वीकारताना फायरमन जाळ्यात
By दिपक ढोले | Updated: August 29, 2023 18:02 IST2023-08-29T18:02:21+5:302023-08-29T18:02:39+5:30
एक हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०० रुपयांची लाच स्वीकारली.

८०० रुपयांची लाच स्वीकारताना फायरमन जाळ्यात
जालना : रिव्हीजन रजिस्टरची नक्कल काढून देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महानगरपालिकेतील फायरमनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. नदीम अब्दुल रहेमान चौधरी (रा. खडकपुरा, मानवत, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदाराने पणजोबाच्या नावावरील बडीसडकजवळील घराची रिव्हिजन रजिस्टरची नक्कल काढून देण्यासाठी अर्ज केला होता. ही नक्कल काढून देण्यासाठी संशयित फायरमन नदीम चौधरी याने एक हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानुसार पथकाने महानगरपालिकेतच मंगळवारी सापळा रचला. येथे एक हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०० रुपयांची लाच स्वीकारली. त्याला ताब्यात घेऊन कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुजित बरडे, गणेश चेके, जावेद शेख, गजानन खरात, शिवलिंग खुळे, ज्ञानदेव जुंबड, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, संदीपान लहाने, आत्माराम डोईफोडे, प्रवीण खंदारे, विठ्ठल कापसे यांनी केली.