जालन्यातील मोतीबाग येथे दुकानाला आग; लाखोचे साहित्य जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:16 IST2018-09-19T14:16:18+5:302018-09-19T14:16:46+5:30
शहरातील मोतीबाग जवळील एका दुकानाला आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली.

जालन्यातील मोतीबाग येथे दुकानाला आग; लाखोचे साहित्य जळाले
जालना : शहरातील मोतीबाग जवळील एका दुकानाला आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास आग लागली. यात दुकानातील साहित्य जळाले असून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
शहरातील मोतीबाग जवळ असलेल्या एका दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशम दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी गेल्या. अग्निशमन दलाने लागलीच आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत आगीत लाखोच्या साहित्याचे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप कळले नाही.