टाटा मोटर्सला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:13 IST2018-09-26T01:13:37+5:302018-09-26T01:13:53+5:30

जालना - औरंगाबाद मार्गावरील टाटा मोटर्स (सतिश मोटर्स) ला मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अचानक मोठी आग लागली

Fire occures in Tata Motors | टाटा मोटर्सला भीषण आग

टाटा मोटर्सला भीषण आग

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जालना - औरंगाबाद मार्गावरील टाटा मोटर्स (सतिश मोटर्स) ला मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अचानक मोठी आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची माहिती चंदनझिरा परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.
ही आग विझविण्यासाठी चंदनझिरा परिसरातील नागरिकांनीही मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज वर्तविण्यात येत आहे. अन्य दुकांनामध्ये ही आग पसरवू नये म्हणून विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Fire occures in Tata Motors