जालन्यात नाफेडच्या खरेदी केंद्राला आग, ५० क्विंटल हरभरा खाक
By विजय मुंडे | Updated: June 5, 2023 13:55 IST2023-06-05T13:54:54+5:302023-06-05T13:55:09+5:30
जवळपास एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले.

जालन्यात नाफेडच्या खरेदी केंद्राला आग, ५० क्विंटल हरभरा खाक
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शासकीय हरभरा खरेदी केंद्राला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत ५० क्विंटल हरभऱ्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. यात जवळपास १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र आहे. या केंद्राला सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास या केंद्राला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच शहरातील अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोन बंबसह घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत ५० क्विंटल हरभरा, १० हजार बारदाना, इतर साहित्य असा जवळपास १२ लाख रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी माधव पानट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप दराडे, फायरमन नितेश ढाकणे, बोरगावकर, गाडे, काळे, नरवाडे, वाहन चालक अशोक वाघमारे, चव्हाण यांच्या टीमने प्रयत्न केले.