अखेर आरोग्य विभागाच्या पथकाने केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:49 IST2018-09-23T00:49:16+5:302018-09-23T00:49:34+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली.

अखेर आरोग्य विभागाच्या पथकाने केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली.
येथील पूजा संजय लक्कस हिचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरुवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावाची पाहणी केली. यावेळी शाळेच्या परिसरात मोठी अस्वच्छता असल्याने ती तातडीने काढण्याच्या सूचना Þ ग्रामपंचायतीला दिल्या. तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांची बैठक घेतली. गावात स्वच्छता राखण्यासाठी व गाव साथरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शांतिकुमार भारडकर यांनी केले.
या पथकामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गावंडे, डॉ. वाघमारे, ग्रामसेवक शिंदे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान वैद्यकी पथकाने कोरडा दिवस पाळण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान केले. जास्त दिवस पाणी साठवून ठेवल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते.