शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

अखेर जालन्यात होणार सिडकोची वसाहत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:44 AM

मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खासगाव आणि घाणेवाडी येथे सिडको वसाहत निर्माण करण्याबाबतचा अहवाल प्रशासनाला अहवाल पाठविण्यात आला. मात्र, या ना त्या कारणाने दोन्ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत हा प्रकल्प रद्द करण्यात आला. अखेर मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत खरपुडी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब करीत सिडकोच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली. याचा अभ्यासपूर्ण अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीस भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.यापूर्वी बदनापूर तालुक्यातील खासगाव येथील जमिनीची पाहणी करुन सिडकोने अहवाल पाठवला होता. अधिकाºयांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे पाठवला. मात्र, प्रदूषण, संभाव्य पाणीटंचाई आदी मुद्द्यांवर हा प्रस्ताव रखडला. त्यानंतर घाणेवाडी परिसरातील जागेची पाहणी करण्यात आली. पाण्याची उपलब्धता आणि इतर बाबी सकारात्मक दिसून आल्याने या जागेचा अहवाल पाठविण्यात आला. मात्र, तांत्रिक मुद्द््यावर येथेही वसाहत निर्माण करण्यात अडचणी असल्याचे सांगत हा प्रस्तावदेखील कालातंराने रद्द करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांचा पाठपुरावा सुरुच होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडको व लोकप्रतिनिधींची बुधवारी बैठक होऊन अखेर खरपुडी येथील जागेवर शिक्कामोर्तब झाले.११०० हेक्टरवर साकारणार सिडको वसाहतप्रस्तावित जालना सिडको प्रकल्प हा मौजे खरपुडी गावात होणार आहे. सिडकोची नियुक्ती ही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी पर्यावरण सल्लागाराची नियुक्ती करून अहवाल सप्टेंबर २०११ रोजी प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे. खरपुडी गावातील एकूण क्षेत्रापैकी ५५९.३६ हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी प्रभागात समाविष्ट असून, उर्वरित ६५०.६५ हेक्टर क्षेत्र हरित भागात समाविष्ट आहे. या क्षेत्रावर शहर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सिडको वसाहतीच्या निमित्ताने जालनेकरांना गृहप्रकल्पाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोState Governmentराज्य सरकार