...अखेर भोकरदन शहरासाठी दहा टँकरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST2018-10-05T00:38:25+5:302018-10-05T00:39:34+5:30
गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.

...अखेर भोकरदन शहरासाठी दहा टँकरला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.
बुधवारी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख तसेच उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन तातडीने भोकरदनमध्ये दहा टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच तसा रितसर प्रस्तावही दिला होता. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहराला पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई धरण कोरडे पडल्यामुळे शहरात तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगर परिषदेने तातडीची विशेष सभा घेऊन २५ टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दिला होता. या प्रकरणी बुधवारी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाअधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी ३ आॅक्टोबर रोजी बाणेगाव धरणातील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ हजार लीटर क्षमता असलेल्या १० टँकरला मंजुरी दिल्याचे यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.
या टँकरच्या माध्यमातून दररोज ७ लाख २० हजार लीटर पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात ओतून ते नळाद्वारे पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था शुद्धीकरण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेही उपनगरअध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, मुख्याधिकारी सोंडगे, नगरसेवक, सुरेश शर्मा, संतोष अन्नदाते, संध्या शर्मा, गयाबाई जाधव, शेख रिजवान, विजय इंगळे, नसीमखॉ पठाण, दीपक बोर्डे, हामदू चाऊस, शेख जफर, दीपक तळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.