शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:20 AM

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम ...

ठळक मुद्देविरेगाव येथे आंदोलन : वाहनांच्या रांगा, प्रशासनासंदर्भात रोष, परिसरातील गावातील शेतकऱ्यांचा सहभाग

विरेगाव : लाखो रुपयांचा पीकविमा भरुनही संबंधीत कंपनीने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. खरिप हंगाम तोडावर असतांना शेतक-यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याने संतप्त शेतक-यांनी या निषेधार्थ बुधवारी जालना तालुक्यातील विरेगाव येथे रास्तारोको आंदोलन करुन विम्याची रक्कम देण्याची मागणी केली.तालुक्यातील विरेगाव, चितळी पुतळी, घोडेगाव धाणोरा, हस्तेपिंपळगाव, कवठा, वझर, ममदाबाद, शिंगाडे पोखरी, शेवगा, सारवाडी परिसरातील हजारो शेतक-यांनी बँकेत रांगा लावून पिकविम्याच्या रक्कमेचा भरणा केला. यासाठी आठ- आठ तास शेतकरी व्यवसाय सोडून बँकेच्या रांगेमध्ये उभे राहावे लागले होते. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतक-यांना विम्याच्या रकमेचा फायदा होतो. मात्र लाखो रुपये विम्याची रक्कम संबंधीत कंपनीकडे भरुनही बोटावर मोजण्याइतपत शेतक-यांना विमा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे विरेगाव आणि रामनगर सजाच्या एकाही शेतकºयाला पीकविमा मंजूर न झाल्याने शेतकºयात रोष आहे. याबाबत सदर कंपनीच्या विरोधात शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळअधिका-यांना निवेदन देऊन विम्याच्या रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी निवेदनाव्दारे होती. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून दूर ठेवण्यात येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. सदर विमा कंपनी आणि प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसात यावर प्रशासनाने निर्णय घेऊन शेतकºयांची विम्याची रक्कम बँकेत जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशार जिल्हा कृषीअधिक्षकांना निवेदनाव्दारे दिला. यावेळी शेतकºयांनी दिला.यावेळी दत्ता कदम, शिवाजी लकडे, किसन मोहिते, माधव टकले, बाबुराव खरात, दिलीप भुतेकर, सुभाष बागल, गणेश कदम, प्रकाश इंगळे, गणेश कारेगावकर, ज्ञानेश्वर काकडे, रावसाहेब मोहिते, भगवान घाटूळ, सुरेश खांडेभराड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांची उपस्थिती होती.वाहतूक खोळंबली : वाहनांच्या रांगाविरेगाव येथील मुख्यमार्गावर शेतक-यांनी तासभर आंदोलन केल्याने जालन्याकडे जाणाºया वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. यावेळी मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रत्नदीप बिरादार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीagitationआंदोलन