कृषिपंपांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST2021-02-20T05:29:04+5:302021-02-20T05:29:04+5:30
विस्कळीत बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय अंबड: राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बसेस अवेळी सुटत आहेत. अवेळी ...

कृषिपंपांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हैराण
विस्कळीत बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय
अंबड: राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक बसेस अवेळी सुटत आहेत. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशी, विद्यार्थ्यांसह व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशी, वाहनचालकांमधून केली जात आहे.
खड्ड्यांमुळे रस्ता अपघातात वाढ
जालना : जालना ते सिंदखेड राजा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघातात वाढ झाली आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
योगेश्वरी कॉलनीत कीर्तन कार्यक्रम
जालना : शहरातील योगेश्वरी कॉलनीत आयोजित कीर्तन कार्यक्रमास प्रतिसाद मिळाला. यावेळी हभप संतोष महाराज आढावणे यांचे कीर्तन झाले. संतोष महाराज आढावणे यांनी विविध दाखले देत उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी हभप शिवराज चव्हाण, गजानन मुळक, हभप संतोष वाघ, तुळशीराम दाभाडे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.