पीकविमा वाटप होत नसल्याने मध्यवर्ती बँकेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:43 IST2018-06-19T00:43:25+5:302018-06-19T00:43:25+5:30
नसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा वाटप होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बँकेला कुलूप ठोकले.

पीकविमा वाटप होत नसल्याने मध्यवर्ती बँकेला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीकविमा वाटप होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी बँकेला कुलूप ठोकले. यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे शेतक-यांना बी-बियाणे खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. मात्र, बँकेतून हक्काचा पीकविमा मिळत नसल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी बारा वाजेच्या सुमारास राजा टाकळी येथील शेतकरी बापूसाहेब आर्दड, कुंडलिक आर्दड, नारायण आर्दड यांच्यासह परिसरातील कुंभार पिंपळगाव, अरगडेगव्हाण, मूर्ती, घोन्सी, भेंडाळा इ. गावांच्या शेतक-यांनी बँकेला कुलूप लावले. बँकेचे शाखाधिकारी विजय कंटुले यांनी पीकविमा वाटपाचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी कुलूप उघडले.
जालना मध्यवर्ती बँकेत वर्ष २०१७ चा पीकविमा शेतक-यांच्या खात्यात जमा झाला आहे. बी-बियाणे खरेदीसाठी शेतक-यांकडे पैसा नाही. त्यामुळे संतप्त शेतक-यांनी बँकेला कुलूप लावून रोष व्यक्त केला.