शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्रीत बँकेसमोर शेतकऱ्याची लूट तर जालन्यात नोकरदाराची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:57 IST

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/ वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली. या घटना सोमवारी सायंकाळी घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील शेतकरी अशोक बाबूराव पांढरे यांना केवळ एक एकर शेती आहे. त्यामुळे उसतोड करुन ते आपल्या संसाराचा गाडा चालवितात. अशोक पांढरे यांनी एक एकर शेतीवर वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून कर्ज काढले होते. मुलगी आजारी असल्याने सोमवारी कर्जातील १५ हजार रूपये काढण्यासाठी ते वडीगोद्री शाखेत आले. हातात पैसे घेऊन ते शाखेच्या बाहेर पडताच दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम हिसकावून घेत पोबारा केला. या प्रकरणी पांढरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पैसे हिसकावल्याने अशोक पांढरे यांचा पाय घसरून ते पायºयावर पडले. तोपर्यंत त्यांना लूटणाºया चोरट्यांनी औरंगाबाद- बीड महामार्गावरील बोगद्यातून पळ काढला. नागरिकांच्या मदतीने पांढरे यांनी त्या चोरट्यांचा माग काढला. मात्र, ते फरार झाले होते. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.जालना येथे खाजगी नोकरी करणारे अशोक कृष्णराव क्षीरसागर हे सोमवारी सायंकाळी पैसे असलेली बॅग घेऊन सायकलवरून जात होते. ते मामा चौकात आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून त्यांच्याकडील ५५ हजार रूपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. या प्रकरणी क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि झलवार हे करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :RobberyचोरीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी