भोकरदन येथील शिबिरात ४७५ जणांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:33+5:302021-01-03T04:31:33+5:30
भोकरदन : जयेश भैया मित्र मंडळाच्या वतीने भोकरदन येथे नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान ...

भोकरदन येथील शिबिरात ४७५ जणांची नेत्र तपासणी
भोकरदन : जयेश भैया मित्र मंडळाच्या वतीने भोकरदन येथे नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात ७५ तर नेत्र तपासणी शिबिरात ४७५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली.
यावेळी दिवंगत नगरसेवक जयेश थारेवाल व शहीद जवान गणेश गावंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिल्लोड रोडवरील जगन्नाथ प्लाझा येथे आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ४७५ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. ४८ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालयासमोर गरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शहरातील शिवाजीनगर, नंदूबाई नगर, समता नगर, जिजाऊ नगर या भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासह साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मंजुषा देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, भाजपा नेते मुकेश चीने, शहराध्यक्ष सतीश रोकडे, एल.के.दळवे, शेषराव तळेकर, मनीष श्रीवास्तव, महेश पुरोहित, मोहन हिवरकर, महादूसिंग डोभाळ, हुकूमसिंग चुडावत, रावसाहेब ढवळे, पंढरीनाथ खरात, किरण देशपांडे, राजू जोशी, शब्बीर कुरेशी, शफीक पठाण, शेख नजीर, अनिल देशपांडे, डॉ. राजपूत, डॉ. जैन यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कृष्णा वाघ व रवी सासनकर यांनी केले.