कर सुनावणीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:00 AM2018-12-13T01:00:45+5:302018-12-13T01:01:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना नगर पालिकेने १२ वर्षानंतर मालमत्ता कर वाढीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असतानाच ...

To expose many shocking types of tax hearings | कर सुनावणीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस

कर सुनावणीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देशेजारील दुकानांना वेगवेगळे कर : कर सर्वेक्षण नव्याने करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेने १२ वर्षानंतर मालमत्ता कर वाढीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असतानाच ज्या एंसजीला हे सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांचे अनेक किस्से आता सुनावणी दरम्यान पुढे येत आहेत. बुधवारी सुनावणीचा दुसरा दिवस होता. त्यावेळी एकाच व्यापारी संकुलातील दोन वेगवेगळ्या दुकानांना वेगवेगळी कर आकारणी करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. सबंधित दुकान दाराने त्याचे पुरावेच सुनावणी अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत.
जालना पालिकेने हाती घेतलेल्या अवाजवी कर वाढीस नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. परंतु आता १२ वर्षांनतर करात वाढ होत असेल तर ती नागरिकांनी स्विकारली पािहजे असे प्रशसनाकडून सांगितले जात आहे. मात्र हे जरी मान्य केले तरी, ज्या एंजीने हे करवाढी संदर्भातील सर्वेक्षण केले आहे, ते करताना ते तथ्याला धरून न केल्याचा आरोप अनेकांनी सुनावणी अधिकाºयांकडे केल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नवीन जालना भागातील एकाच व्यापारी संकुलात शेजारी-शेजारी असलेल्या एका दुकानाला केवळ ९०० रूपये आणि त्याच्या शेजारी असलेल्या दुकानास चक्क २२०० रूपये कर भरण्यासाठीच्या नोटीस देण्यात आल्याचे दिसून आले. हे तर या प्रकरणातील हमनगाचे एक टोक आहे. अनेक ठिकाणी नवीन बांधकाम झाले नसताना ते बांधकाम झाल्याचे दर्शविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: To expose many shocking types of tax hearings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.