शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

कार्यकारिणीने समाजाबरोबरच देशसेवा करावी -लता लाहोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:38 AM

अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नूतन कार्यकारिणीने पदाला शोभेल असे काम करावे. संघटनचे नियम आणि आचारण लक्षात घेऊन काम केल्यास या पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अ. भा. स्तरावर काम करणा-या माहेश्वरी महिला संघटनचे बळ या कार्यकारिणीच्या पाठीशी असल्याचे सांगून नवनियुक्त कार्यकारिणीने चौकटीत राहून समाजाबरोबरच देश सेवा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या दोनदिवसीय बैठकीचा शनिवारी सपारोप झाला. बैठकीच्या सुरुवातीस महेश पूजन करून निवडणूक परिवेक्षका सुशील काबरा यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बैठकीस प्रारंभ करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी लता लाहोटी यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली. त्यात माजी प्रदेश सचिव अनुसया मालू यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तर संघटनमंत्री म्हणून मंगला भंडारी (जालना), सचिव सुनीता पल्लोड (ठाणे) आणि कोषाध्यक्षा म्हणून सोलापूरच्या निर्मला बलदवा यांची नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष मालू यांची नियुक्ती जाहीर होताच सभागृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माहेश्वरी महिला संघटनच्या जालना जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, सचिव मिनाक्षी दाड आणि त्यांच्या सहकारी पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समित्यांच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी निर्मला साबू, मिनाक्षी दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, राजेश्री दरक, उपाध्यक्षा नूतन दाड, शिल्पा मालपाणी, पद्मा तापडीया, कविता लखोटीया, शारदा बाहेती, कोषाध्यक्षा अनिता राठी, संगीता लाहोटी, शारदा लखोटीया यांच्यासह निर्मला करवा, सुर्यमाला मालाणी यांनी परिश्रम घेतले.या बैठकीस जिल्हा, शहर व राज्यभरातून आलेल्या महिलांसह समाजातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यकारिणीने जोमाने काम करावे- सुशीला काबरायावेळी मार्गदर्शन करताना सुशीला काबरा म्हणाल्या, नवीन कार्यकारिणीने ना उमेद होता अत्यंत जोमाने काम करुन समाज आणि देश सेवेला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा लोया आणि संगीता लाहोटी यांनी केले तर आभार मिनाक्षी दाड यांनी मानले.प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या या बैठकीस माजी मंत्री आ. राजेश टोपे आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. टोपे यांनी आपल्या भाषणातून माहेश्वरी महिला संघटनच्या कार्याचे कौतुक करून हा समाज नेहमीच सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारा आहे. दानशूर वृत्ती असलेल्या या समाजामुळे अनेक दीन- दुबळ्यांना आधार मिळालेला आहे. त्यामुळे या समाजाचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :communityसमाजWomenमहिलाSocialसामाजिक