शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चार जनावरे तलावाच्या गाळात फसल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:50 IST

मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथील लघु तलावात शिंदखेड येथील शेतकरी बाळकृष्ण ढेकळे यांची चार जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेली असताना गाळात फसली. पण, सुदैवाने गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे ती चारही जनावरे वाचली.ढेकळे यांचा गुराखी नामदेव जाधव याने २० जनावरे पाणी पाजण्यासाठी म. चिंचोली येथील लघु तलावावर बुधवारी दुपारी ३ वाजता आणली. त्यातील दोन गाय व दोन वासरे पाणी पिता- पिता पुढे सरकली असता ती पूर्णपणे गाळात फसली. दरम्यान, अशोक सोळंके व सय्यद केयफ हे युवक आपली जनावरे घेऊन पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना ही जनावरे फसलेली दिसली. त्यांनी हा प्रकार गावात येऊन सांगितला. यानंतर आस्था तेथील तरुण साहेबराव घोगरे, मच्छिंद्र निवदे, भास्कर पाळीक, विनोद घोगरे, परमेश्वर घोगरे, उमेश रणमाळे, नारायण वर्जे यांनी लघु तलावाकडे धाव घेऊन गाळात फसलेली लाकडी बल्लीने च्या साह्याने जनावरे बाहेर काढली. अन्यथा काही अनुचित प्रकार घडला असता.यापुढे प्रशासनाने तातडीने जनावरांच्या चारा- पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.याच ठिकाणी २०१८ मध्ये धुने धुवायला गेलेल्या सहा मुली गाळात फसल्या होत्या. त्यापैकी तीन मुलींना आपला जीव गमवावा लागला होता.याच ठिकाणी पाणवठा असता तर ही जनावरे फसली नसती व त्या मुलींनीही आपला जीव गमावला नसता या तलावाची निर्मिती १९९४ ला झाली आहे.दुष्काळामुळे यावर्षी पाणी फक्त नदीच्या पात्रात राहिलेले असून पात्रात ५ ते १० फूटापर्यंत गाळ आहे. १९९४ पासून या तलावात आतापर्यंत १२ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जनावरे ही फसून मेली आहेत.

टॅग्स :cowगायIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाईSocialसामाजिक