घातपात करण्याआधीच पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

By दिपक ढोले  | Updated: April 29, 2023 15:47 IST2023-04-29T15:46:59+5:302023-04-29T15:47:25+5:30

दोघांकडून खंजीरसह कुकरी जप्त करण्यात आली आहे

Even before the attack, the police caught two | घातपात करण्याआधीच पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

घातपात करण्याआधीच पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

जालना : घातपात करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. शेख अलीम अब्दुल कलीम तांबोळी (रा. अफगान मोहल्ला, जालना), बाबू सुरेश भोसले (रा. इंदिरानगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून खंजीरसह कुकरी जप्त करण्यात आली आहे. 

शेख अलीम अब्दुल कलीम तांबोळी, बाबू सुरेश भोसले हे दोघे घातपात करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या शस्त्र बाळगून परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने इंदिरानगर भागात छापा टाकून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खंजीर, कुकरी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सुधीर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस अंमलदार भाऊराव गायके, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, कैलास चेके यांनी केली आहे.

 

Web Title: Even before the attack, the police caught two