शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित वर्गाला जबाबदारी सांभाळावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

जालना : संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश इस्लाम धर्माने दिला. मात्र, या धर्माविरद्ध षड्यंत्र रचले जात आहे, त्यात सोशल मीडियाचाही ...

जालना : संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश इस्लाम धर्माने दिला. मात्र, या धर्माविरद्ध षड्यंत्र रचले जात आहे, त्यात सोशल मीडियाचाही मोठा वाटा आहे. याविरूद्ध लढण्याची जबाबदारी समाजातील सुशिक्षित वर्गाला सांभाळावी लागेल, त्यासाठी मुस्लिम समाजातील वकीलांनी पुढाकार घ्यावा, असे मत रजा अकादमीचे महाराष्ट्र अध्यक्ष अलहाज मोहंमद सईद नूरी यांनी व्यक्त केले.

जालना येथे घेण्यात आलेल्या तहफ्फुजे नामुसे रिसालत बोर्डच्या बैठकीत सईद नूरी यांनी वकीलांशी संवाद साधला. यावेळी मौलाना मोहंमद अब्बास रजवी, मौलाना जफरोद्दीन, अहमद रजा, इकबाल वोरा, सय्यद नदीम यांच्यासह जमील मौलाना, मौलाना गुलाम जिलानी मिसबाही, मुनवरखान लाला आदी उपस्थित होते.

प्रारंभी हा हाफिज वसीम रजा यांनी प्रास्ताविक केले. जमील मौलाना यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहीजे, असे स्पष्ट केले. त्यासाठी कायद्याचा आधार घेऊन दोषींना शिक्षा होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. या कामात वकिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीस ॲड. राशेद, ॲड. सय्यद रहमत अली, सोहेल सिद्दीकी, ॲड. याकूब, ॲड. अर्शद बागवान, सैय्यद जहीर बियाबानी, ॲड. सय्यद शाहेद, ॲड. शेख अहमद, ॲड. अमजद पठान, ॲड. सोहेल खान, ॲड. खुर्रम खान, ॲड. अलीम परसुवाले, ॲड. अनसार शेख आदींची उपस्थिती होती.

....

वकिलांनी मांडले म्हणणे

समाजात असंतोष निर्माण करणाऱ्यांविरूद्धच्या खटल्यात वकिलांची संपूर्ण टीम उभी राहील, अशी ग्वाही जालन्यातील वकिलांनी या बैठकीत दिली.

हायकोर्टाचे वकील सोहेल सिद्दकी यांनी सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्यांविरूद्ध कोणते कायदे आहेत, याबाबत माहिती दिली. यावेळी ॲड. याकूुब अली, ॲड. शाहेद, ॲड. शेख अहमद यांनी मनोगत व्यक्त केले. ......

फोटो..पान २ मुस्लिम

तहफ्फुजे नामुसे रिसालत बोर्डाच्या बैठकीत बोलताना सईद नूरी, सोबत जमील मौलाना, मौलाना गुलाम जिलानी मिसबाही व इतर.