शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:32 AM

एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्याची ओळख ही संत-महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात दुष्काळ हा जणूकाही पाचविलाच पूजलेला आहे. मराठवाड्याचे भूमीपुत्र आणि माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे पैठण येथे जायकवाडीचे धरण झाले.यामुळे तरी किमान काही शहरांचा विकास झाला आहे. त्यानंतरचा दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे निम्न दुधना म्हणता येईल. जायकवाडीतून उजवा आणि डाव्या कालाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. गोदावरी काठावरील संपन्न शेतीमुळे तरी या भागात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊसाची लागवड होऊन साखर कारखानदारी बहरली. असे असले तरी मराठवाड्याच्या बहुतांश भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा नवीन नाही. त्यामुळे यंदा आपण केवळ जालना जिल्ह्याचाच विचार केल्यास केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे.खरीप हंगामात पेरणी केल्यावर आणि हवामान खात्याच्या शंभर टक्के पर्जन्यमानाच्या अंदाजाने सर्वजण सुखावले होते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरीही लावली. परंतु नंतर त्याने पाठ फिरवली त्यामुळे बळीराजा पिळून निघाला. रबी हंगामात तर पावसाने पेरणी योग्य शिडकावाही केला नाही. त्यामुळे रबीचा विषय संपला आहे. कपाशीची लागवड जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, ५० टक्केपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकºयांचे डोळे पांढेरे झाले आहेत. लावलेला खर्चही निघालेला नाही. त्यामुळे आता सर्वस्व अवलंबून हे माय-बाप म्हणविणा-या सरकारवर आहे. पिकविमा, तसेच दुष्काळी अनुदानाच्या माध्यमातून मदतीची आशा आहे. जिल्ह्यातील ९७० गावातील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. या दुष्काळात राज्यातील शेतकºयांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारकडून सात हजार कोटींचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. जात आहे. त्यामुळे हे पॅकेज मिळाल्यास किमान दुष्काळ तरी अच्छे दिनचे स्वप्न हे सरकार पूर्ण करेल काय या चिंतेत सर्वजण आहेत. जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतेच केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांचे पथक मंगळवारी येऊन गेले. त्यांनी बदनापूर तालुक्यातील जवसगाव आणि जालना तालुक्यातील बेथलम येथे पाहणी केली. मात्र एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती. हे पथक आल्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे प्रश्न हिंदीतून असल्याने बळीराजाची तारांबळ उडाली. अनेकांनी या पथकाकडे चारा-पाण्याची व्यवस्था ही तातडीने करण्याची मागणी केली. तर काही शेतकºयांनी शेततळ्यासाठी लागणारी प्लास्टिकची पन्नी देण्याचे सांगितले. परंतु दुर्दैव हे की, या पथकातील सदस्यांनी हम कुछ देणे नही..सिर्फ देखने आये है..असे सांगून शेतकºयांच्या आशेवर पाणी सोडले. या शिष्टमंडळात जे अधिकारी होते निश्चितच त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते.परंतु दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्यांना शेतीतले कळते अशांना या पाहणी पथकात सहभागी करून घेतले असते तर यामुळे बळीराजाला आणखी विश्वास वाटला असता. नसता हा दौराही एक उपचार म्हणून रहिला तर मात्र, बळीराजाची ताकद काय असते ते आगामी काळातील राजकीय मैदानातून दिसून येणार आहे. केवळ शेतकºयांची मने जिंकून सरकार काही तरी करत आहे, असे भासविण्यापेक्षा काही तरी ठोस येत्या एक-दोन महिन्यात मिळाल्यास या पाहणी दौ-याचे फलित म्हणावे लागेल.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार