शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

३१ मे पर्यंत दुष्काळी अनुदान वाटपाची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : राज्य सरकारने खरीप २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३२० कोटीेंचे अनुदान मंजूर केले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने खरीप २०१८ मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३२० कोटीेंचे अनुदान मंजूर केले होते. कमी पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना मदत म्हणून हे अुनदान वर्ग केले होते. संबंधित अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी बँकांना दिले होते. मात्र, त्यातील बहुतांश अनुदान अद्यापही शेतक-यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे दिसून आले. शिल्लक अनुदान ३१ मे पूर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश सोमवारी बँक अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनववडे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांच्यासह राष्ट्रीय तसेच खासगी बँकांचे व्यवस्थापक हजर होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी अत्यंत कडक भूमिका घेत, व्यवस्थांपकांना खडसावले. अनुदान वाटपामध्ये मोठा गोंधळ असल्याचे दिसून आले. हे अनुदान शेतक-यांच्यासाठी मदत म्हणून राज्य सरकारने जिल्ह्याला दिले होते. परंतु त्याचे वाटप नेमके कोणत्या कारणांमुळे रखडले, याची समाधानकारक उत्तरे अधिका-यांना देता आले नाहीत, त्यातच राष्ट्रीयकृत बँकांनी तर पीककर्ज वाटपासह अनुदान वाटपातही चलता है ची भूमिका घेतल्याने बिनवडे हे जाम चिडले होते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.जालना जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आर्थिक संकटात आहेत, ही बाब लक्षात घेऊन आगामी काळातील पीककर्ज वाटपासाठी आतापासून नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पीककर्ज वाटपासाठी बँक, महसूल आणि सहकार या विभागांनी तालुका पातळीवर मेळावे घेऊन पीक वाटपाची गती वाढवावी. दर आठवड्यात किमान दहा टक्के पीककर्ज आतापासून वाटप करण्याचे उद्दिष्ट यावेळी देण्यात आले. या बैठकीस जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव तसेच अन्य बँक व्यवस्थापकांची उपस्थिती होती.मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांबद्दल नाराजीचा सूरजालना जिल्हा मध्यवर्ती बँके प्रमाणे अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट गेल्या वर्षी पूर्ण केले नव्हते. कर्जाचे पुनर्गठन करण्याकडेही बँकांनी पाठ फिरवली होती. या मुद्यावरून जिल्हाधिकारी बिनवडे यांनी मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त करून आगामी खरीप आणि रबी हंगामात पीककर्ज वाटपात सुधारणा करण्याचेही आदेश दिले.अनुदानातून वसुली नकोजालना जिल्ह्यात ३२० कोटी रूपयांचे अनुदान मिळालेले आहे. हे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करताना अनेक बँका या कर्जाचे हप्ते त्यातून कापून घेत असल्याचे दिसून येते. ते त्वरित थांबविण्यासह सक्तीची कर्ज वसूली न करण्याचेही निर्देश या बैठकीत देण्यात आले. बँकेच्या व्यवस्थापकांनी अपु-या मनुष्यबळाचा मुद्दा जिल्हाधिका-यांच्या कानावर घातला. मात्र, या मुद्यावरून कामे न थांबविण्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना